संकल्प-विकल्प
। फेडले लुगडे
निःशंक उघडे ।
केले मन..!
सात्विक ते
धैर्य । आतून उगवे
बुद्धी-चंद्रामागे
। उगी राही..!
जे जे आहे ते सर्व त्रिगुणात्मक आहे.
याचे तपशीलवार वर्णन करताना सात्विक धैर्यासंदर्भात ही उपमा दिलेली आहे.
अधोर्ध्व गुढें काढी । प्राण नावाची
पेंडी । बांधोनी घाली उडी । मध्यमेमाजी ॥
संकल्प-विकल्पांचें लुगडे । सांडूनि मन
उघडें । बुद्धीही मागिलेकडे । उगीचि बैसे ॥ ७३९, ४० / १८
जे धैर्य प्राण..अपान.. आदि नऊ वायुंची जुडी
करून नंतर सुषुम्नेमधे उडी घेते, संकल्प-विकल्पांचें वस्त्र उतरवून मन उघडे करते
आणि बुद्धीच्या मागे जाऊन निवांत बसते.. असे धैर्य ते सात्विक धैर्य..!
No comments:
Post a Comment